नाशिक (जय जोशी): – गणेशोत्सव जवळ आला आहे आणि बाजारपेठेत मूर्ती विक्रीचा जल्लोष सुरू आहे. मात्र, त्यात POP (Plaster of Paris) मूर्तींचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे बाप्पाच्या नावाखाली पर्यावरणाची हत्या सुरू असल्याचं पर्यावरणप्रेमींचं स्पष्ट मत आहे.
POP मूर्तींमुळे नद्यांमध्ये विषारी रसायनं मिसळतात, मासेमारीवर परिणाम होतो आणि पाण्याचं प्रदूषण दीर्घकाळ टिकून राहतं. याशिवाय काही ठिकाणी बाप्पाला इतर देवांच्या रूपात साकारण्याची प्रथा वाढते आहे, जी पारंपरिकतेला धक्का देणारी असल्याचंही सांगितलं जातं.
पर्यावरण कार्यकर्ते आवाहन करत आहेत – “बाप्पा आणा, पण पर्यावरणपूरक मूर्तींसह! मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग आणि पारंपरिक स्वरूप – हाच खरा सणाचा गाभा आहे.”
महापालिकेने POP मूर्ती विकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे, पण खरी जबाबदारी नागरिकांचीच आहे. सणाचा आनंद साजरा करायचा, की पर्यावरणाचा अंत घडवायचा – हा निर्णय आता आपल्या हाती आहे.








