बुलढाणा (मिर्झा अक्रम बेग) : उठ आदिवासी जागा हो… संघर्षाचा धागा हो…. बंजारा – धनगर समाजाने केलेल्या अनु.जमातीत आरक्षण मागणीच्या विरोधात 6 ऑक्टोबर रोजी बुलढाण्यात आदिवासींचे वादळ धडकणार आहे. तर आरक्षण बचाव सह विविध मागण्यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने “आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा “ काढण्यात येणार आहे. तरी या आदिवासी आरक्षण आक्रोश मोर्चा सकल आदिवासी समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन “बिरसा क्रांती दल” बुलढाणा जिल्हाध्यक्ष विनोद भोकरे यांनी केले.

बंजारा – धनगर समाजाने आम्हाला अनूसुचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मोर्चे आंदोलन सुरु केले आहे. बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची दखल घेत सत्ताधारी पक्षातील आमदार – खासदार व मंत्र्यांनी बंजारा समाजाला अनुसुचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवित जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे या सर्व आमदार खासदार व मंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. बंजारा धनगर समाजाने केलेल्या अनु.जमातीत आरक्षण मागणीच्या विरोधात चलो बुलढाणा…! चलो बुलढाणा…! चलो बुलढाणा…! चलो बुलढाणा…! , जय आदिवासी जय बिरसा, एक तिर एक कमान! सभी आदिवासी एक समान, उठ आदिवासी जागा हो… संघर्षाचा धागा हो…. असा नारा देत “आदिवासी आरक्षण बचाव, आक्रोश मोर्चा सोमवार ०६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वा. विर एकलव्य महाराज पूतळ्या जवळ, जयस्तंभ चौक, बुलढाणा येथून काढण्यात येणार आहे. या आक्रोश मोर्चात अनुसूचीत जमाती प्रवर्गामध्ये बंजारा, धनगर व इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये. आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र वळवू नये. वळविलेला निधी व्याजासहीत आम्हाला परत करण्यात यावा. बोगस आदिवासींना देण्यात आलेले सेवा संरक्षण मागे घेऊन त्यांना बडतर्फ करण्यात यावे व त्या ठिकाणी तात्काळ खऱ्या आदिवासीची नोकर भरती करण्यात यावे. छत्रपती संभाजीनगर येथे मुस्लिम धर्मीयांना टाकणकार जमातीची बोगस जात वैधता प्रमाणपत्र दिले या गंभीर प्रकरणासाठी एस.टी.आय. समिती स्थापन करण्यात यावी व संबंधीत अधिकारी यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. आदिवासीची हक्काची १२५०० अधिसंख्य पदभरती व ८५००० हजार रिक्त पदे भरण्यात यावी. अशा मागण्या करण्यात येणार आहेत तरी या आक्रोश मोर्चाला सहभागी होण्याचे आवाहन बिरसा क्रांती दल, आदिवासी हक्क व आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती बुलडाणा व बुलडाणा जिल्ह्यातील सर्व आदिवासी सामाजिक संघटना सर्व समाज संघटना बुलडाणा यांनी केले आहे.
“ जय आदिवासी जय बिरसा” आरक्षण आमच्या हक्काचं… नाही कोणाच्या बापाचं… -विनोद भोकरे
समस्त आदिवासी बांधवांनो, आता खरी आदिवासीयत दाखवाची वेळ आली आहे. दिवसेंदिवस आपल्यावरचा अन्याय, अत्याचार हा वाढतच आहे. आधी धनगर, आज बंजारा आपल्या आरक्षणात हिस्सा मागत आहे आणि आपण आज गप्पच बसलो तर उद्या इतर कोणी येऊन आपल्या मानगुटीवर बसेल म्हणून आजच जागे व्हा ! चूप बसाल तर उद्या आपल्या मुलांना भीक मागण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका आल्या की नेत्यांना आदिवासी समाज दिसतो मात्र संकटाची वेळ आली की आदिवासी समाजाला विरोध करण्यात येते. सत्ताधारी आमदार – खासदार व मंत्र्यांनी बंजारा समाजाला पत्र काढून पाठींबा दिला आहे. त्यामुळे धनगर – बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात आरक्षण मागणीच्या विरोधात यासह विविध काही महत्वाच्या मागण्यांसाठी काढण्यात येणाऱ्या आरक्षण बचाव भव्य आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येने आपल्या मुलां-बाळांसह सामील व्हावे अशी मागणी आदिवासी युवानेते तथा बिरसा क्रांती दल बुलढाणा जिल्हाध्यक्ष विनोद भोकरे (खामगाव) मो. 9021889488 व युवा जिल्हाध्यक्ष दिपक लठाड (गणेशपूर) मो. 9767446976 यांनी केली आहे.







