MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

पोलीस व जिल्हा परीषद प्रशासनास वेठीस धरत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आंदोलनकर्त्यांविरुध्द गुन्हा

आंदोलन म्हणजे "नौटंकी" अन् "चोऱ्यांच्या उलट्या बोंबा" एकाने घरकुल न बांधता लाटले अनुदान तर दुसऱ्याने बेकायदेशीर सरकारी जमीनवर नावावर करून बांधले टीनशेड – सरपंच

बुलढाणा(प्रतिनिधी ):- जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील भोसा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशीसाठी बुलढाणा जिल्हा परिषदच्या टॉवरवर चढुन दोन ग्रामस्थांनी शोले आंदोलन सुरू केले. आंदोलन पूर्वी आंदोलनकर्त्यांनी बिडीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन आत्मदाहनाचा इशारा दिला होता. मात्र डोणगाव पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने 30 सप्टेंबर रोजी दोन्ही आंदोलनकर्ते बुलढाणा जिल्हा परिषद टॉवरवर चढून आंदोलन केले. मात्र डोणगाव पोलिसांनी दोन्ही आंदोलनकर्त्यांना नोटीस देत ताब्यात घेतले असते तर जिल्हा परिषद प्रशासन व बुलढाणा शहर पोलीस प्रशासनाला आंदोलकांना खाली उतरविण्यासाठी कसरत करावी लागली नसती. तर पोलीस व जिल्हा परीषद प्रशासनास वेठीस धरत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

                 विशेष म्हणजे यातील एका ग्रामपंचायत सदस्य पतीने ग्राम विकास अधिकाऱ्यासोबत संगनमत करून कोणतेही घरुकुल न बांधता घरकुलाचे अनुदान लाटल्याचे उघड झाले आहे. तशी यादी पण भोसा गावात व्हायरल झाली आहे. तर दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्य पती तथा आंदोलनकर्त्याने ग्रामविकास अधिकाऱ्याच्या संगनमताने सरकारी जमीनीचा 8 अ स्वतःच्या नावे करून त्यावर टीनशेड बांधले आहे. याला विरोध केला असता दोघांनी सरपंच यांच्यावर बिन बुडाचे आरोप करीत आत्मदहनाचा खेळ मांडला. असा आरोप सरपंच यांनी आंदोलकांवर केला आहे.  तर ग्रामविकास अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असून मी महिला सरपंच असल्याने मला तूच्छतेची वागणूक करीत असल्याचे आरोप सरपंच यांनी केले आहे. त्यामुळे घोटाळा उघड होवू नये म्हणून हा प्रकार तर नाही ना? हे आंदोलन म्हणजे “नौटंकी” अन् “चोरांच्या उलट्या बोंबा “अशी उलट सुलट चर्चा सुरु आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भोसा येथील ग्रामपंचायत सदस्य पती संजय करवते, ग्रामपंचायत सदस्य पती सचिन जाधव यांनी तालुक्यातील भोसा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशीसाठी 30 सप्टेंबर रोजी बिडीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून 30 सप्टेंबर रोजी “महाराष्ट्रात” कोठेही आत्मदहन करू असा आत्मदाहनाचा इशारा दिला होता. या निवेदनात भोसा येथील ग्रा.पं. सरपंच श्रीमती. चित्रलेखा दिनकर चव्हाण यांचे पती दिनकर सखाराम चव्हाण यांच्या नावाने असलेले वडिलोपार्जित घर यांचे क्र. १७७ मध्ये अवैध बांधकाम करुन अतिक्रमण केलेले आहे. तसेच भोसा ग्रा.पं. मध्ये सरपंच श्रीमती. चित्रलेखा दिनकर चव्हाण यांनी मनमानी कारभार करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच ऑगष्ट महिन्याची महत्वाची असलेली ग्रामसभा सुध्दा घेतलेली नाही तसेच भोसा ग्रा. पं. चा विकास निधी ३६ लक्ष रुपये ग्रा.पं. मध्ये पडून असल्याने सरपंच श्रीमती. चित्रलेखा दिनकर चव्हाण हया विकास कामाकडे लक्ष देत नाही अशा मनमानी कारभार करणाऱ्या व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंच श्रीमती. चित्रलेखा दिनकर चव्हाण हयांना तात्काळ कायम स्वरुपी पदमुक्त करण्यात यावे, अश्या मागण्या करण्यात आल्या होत्या. या निवेदनाची दखल घेतं बिडीओ यांच्या मार्गदर्शनाखाली 28 सप्टेंबर रोजी चौकशी करण्यात आली होती. तर डोणगाव पोलिसांनी दोन्ही आंदोलनकर्त्याच्या घरावर नोटीस लावली होती. मात्र दोन्ही आंदोलनकर्ते गावात फिरत होते. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी 30 सप्टेंबर रोजी डोणगाव पोलिसांना चकमा देत दिलेल्या निवेदनानुसार ग्रामपंचायत सदस्य पती संजय आश्रूजी करवते आणि ग्रामपंचायत सदस्य पती सचिन रमेश जाधव यांनी 30 सप्टेंबर रोजी सकाळी भोसा येथून जात बुलढाणा येथे जाऊन प्रशासनाच वेठीस धरत जिल्हा परिषद टॉवरवर चढून आंदोलन केले. आमच्या मागण्या पूर्ण करा, असे नारे देत हे जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत खाली उतरणार नाही. असा पवित्रा दोघांनी घेतला आहे. यावेळी घटनास्थळी पोहचून जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात व ठाणेदार रवी राठोड यांनी आंदोलनकर्त्याना खाली उतरण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. मात्र आंदोलनकर्ते ग्रामपंचायत सदस्यपती यांनी पोलीस प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासन यांना वेठीस धरत आंदोलन सुरूच ठेवले होते. दरम्यान जिल्हा परिषद मुख्यकार्यपालन अधिकारी व ठाणेदार खरात यांच्यासह प्रशासनाच्या प्रयत्नाने आंदोलनकर्त्यांना खाली उतरवत 4 दिवसात चौकशी करून उचित कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले तर सचिव व सरपंच यांना “शो कॉज” नोटीस बजावली आहे.

 

 

जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या संजय आश्रूजी करवते व इतर यांना दिलेल्या पत्रात उपरोक्त तक्रारीअन्वये या कार्यालयाचे संदर्भ क्र. २ नुसार गट विकास अधिकारी, पं.स. मेहकर यांना चौकशी करुन उचितकार्यवाही बाबत कळविण्यात आले होते. संदर्भ क्र. ३ चे गट विकास अधिकारी यांचे पत्रानुसार याबबातीत चौकशी सुरु केलेली आहे. चौकशी मध्ये बरेच मुददे असलयामळे पुढील ४ दिवसोमध्ये याची चौकशी करुन अहवाल मागविण्यात येईल. तसेच संदर्भ क्र. ३ नुसार संबंधित सरपंच/ सचिव यांना कारणे दाखवा नोटीस देवून उपरोक्त मुद्यांस जबाबदार असल्याबाबतचा खुलासा मागीतलेला आहे. त्यांचा खुलासा प्राप्त करुन तसेच गट विकास अधिकारी यांचेकडून चौकशी अहवाल प्राप्त करुन नियमानुसार उचीत पुढील कार्यवाही करण्यात येईल. तरी आपण आपल्या आंदोलनापासून परावृत्त होवून प्रशासनास सहकार्य करावे असेल नमूद करण्यात आले होते.

 

जर डोणगाव पोलिसांनी आंदोलनकर्त्या ग्रामपंचायत सदस्य पती संजय करवते व सचिन जाधव यांना नोटीस बजावत न करता दोघांना पोलीस नजरकैदेत ठेवले असते तर जिल्हा परिषद व पोलीस प्रशासनावर नामुष्कीची वेळ आली नसती. या आंदोलन प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला संजय करवते व सचिन जाधव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यातील ग्रामपंचायत सदस्य पतीने ग्राम विकास अधिकाऱ्यासोबत संगनमत करून कोणतेही घरुकुल न बांधता घरकुलाचे अनुदान लाटल्याचे उघड झाले आहे. तशी यादी पण भोसा गावात व्हायरल झाली आहे. तर दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्य पती तथा आंदोलनकर्त्याने ग्रामविकास अधिकाऱ्याच्या संगनमताने सरकारी जमीनीचा 8 अ स्वतःच्या नावे करून त्यावर टीनशेड बांधले आहे. त्यामुळे यांचा घोटाळा उघड होवू नये म्हणून हा प्रकार तर नाही ना? त्यामुळे हे आंदोलन म्हणजे “नौटंकी”  अन् “चोरांच्या उलट्या बोंबा “अशी उलट सुलट चर्चा सुरु आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

 

लोकशाही पध्दतीने आंदोलन करा – ठाणेदार नागरे

डोणगाव – पोलीस हद्दीतील भोसा येथील संजय करवते व सचिन जाधव यानी ग्रामपचायत मधील भ्रष्ट्राचाराविरोधात निवेदन देवून आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने डोणगाव पोलिसांनी दोन्ही आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावत लोकशाही पध्दतीने आंदोलन करावे. कोणत्याही प्रकारचे आत्मदहन करु नये. दोन्ही आंदोलनकर्ते नोटीस देतेवेळी न मिळाल्याने त्यांच्या घराला नोटीस लावून पंचनामा केला सदर माहिती पंचायत समिती प्रशासनास कळवून त्यांचे मन परीवर्तन करून आत्मदहन करणार नाही असा अहवाल पोलीस स्टेशनला सादर करावा अशी माहिती ठाणेदार नागरे यांनी ‍दिली.

 

आत्मदहन आंदोलन म्हणजे नौटंकी – सरंपच सौ चित्रलेखा चव्हाण

भोसा- मी भोसा गावासाठी निधी उपलब्ध करून गावात अनेक विकासकामे केली आहे व सुरु आहे. मात्र माझ्या कार्यकाळात गावाचा विकास होत आहे हे विरोधकांना सहन होत नाही. त्यामुळे माझ्यावर खोटे – नाटे आरोप करीत आहे. माझ्यावर केलेले सर्व आरोप ‍बिनबुडाचे आहेत. माझ्या पतीचे नावे असलेले घर वडीलोपार्जित आहे. त्याचा ग्रामविकास अधीकारी यांनी ‍नियमानुसार दिलेला 8 अ सुध्दा आहे.  ग्रामविकास अधिकारी गावात राजकारण करत असून ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाचा मनमानी कारभार करीत आहे.  ग्रामविकास अधिकाऱ्याने सर्व दस्तावेज घरी नेण्यात आले आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरुन गावातील विकास कामांना अडथळा आणण्याचे काम ग्रामसेवक करीत आहे. मनमानी करुन सरकारी जागा नावाने करणे, ज्यांचे घरकूल बांधण्यात आले नाही त्यांना अभीयंत्याच्या खोटा अहवाल घेवून घरकुलाचे अनूदान देणे. मी महीला सरपंच असल्याने मला ग्रामपंचायत कारभार काय समजणार? असा त्यांच्या समज आहे. सामान्य गरीबा लोकांचे घरकुल पूर्ण होवून घरकुलाचे अनुदान अद्याप दिले नाही. मात्र ज्यांनी घरकुलाची एकही विट न बांधता अनुदान लाटले. यास विरोध केला असता ग्रामविकास अधीकाऱ्याने दोन्ही आंदोलन कर्त्याना हाताशी धरुन माझ्यावर खोटे आरोप लावले आहे. यामधील एका आंदोलन कर्त्यांने घरकुल न बांधता 85 हजार रुपये अनुदान लाटले तर दुसऱ्याने सरकारी जागा नावावर करुन त्यावर टीनशेड बांधून ते आता विक्रीस काढले आहे. ग्रामपंचायत सदस्य पतीचा घोटाळा उघड येवू नये म्हणून दोघांचे आत्मदहन आंदोलन म्हणजे नौटंकी आहे असा आरोप सरंपच सौ चित्रलेखा चव्हाण यांनी केला आहे. तर माझ्यावर कितीही खोटे आरोप झाले तरी मी गावाच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध राहून गावाची सेवा करीत राहणार आहे असा संकल्प सरपंच यांनी केला आहे.

 

ग्रामविकास अधिकारी ठाकरे यांचा फोन बंद 

सदर प्रकरण ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यकाळात असल्याने त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता त्यांचा फोन बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. या आधी सुद्धा ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयन्त केला असता त्यांचा फोन बंद होता.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts