बुलढाणा (प्रतिनिधी) बिरसा क्रांती दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डी.बी. अंबुरे यांच्या आदेशान्वये विभागयी अध्यक्ष संतोष ठाकरे यांच्या उपस्थितीत “बिरसा क्रांती दल” बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी विनोद भोकरे ( खामगाव ) तर युवा जिल्हाध्यक्षपदी गणेश लठाड ( गणेशपूर ता. खामगाव) यांची 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विनोद भोकरे व युवाजिल्हाध्यक्ष गणेश लठाड यांनी राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांच्यासह राज्य उपाध्यक्ष अंबुर व विभागीय अध्यक्ष संतोष ठाकरे यांचे आभार मानले. तर आदिवासी समाजाच्या विकासासाठी लढत राहणार अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष विनोद भोकरे यांनी दिली.
महाराष्ट्रासह देशातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता, संरक्षणासाठी व शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती. ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य “बिरसा क्रांती दल” या कॅडरबेस वैचारिक संघटनेची निर्मिती झाली. या संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचे काम निरंतर सुरु आहे. “बिरसा क्रांती दलाचे” संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दशरथजी मडावी हे संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानासाठी व विकास व जनजागृती साठी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डी.बी. अंबुरे यांच्या आदेशान्वये विभागयी अध्यक्ष संतोष ठाकरे यांच्या उपस्थीतीत “बिरसा क्रांती दल” बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी विनोद भोकरे ( खामगाव) तर युवा जिल्हाध्यक्षपदी गणेश लठाड ( गणेशपूर ता. खामगाव) यांची 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवनियुक्त “बिरसा क्रांती दल” बुलढाणा जिल्हाध्यक्ष विनोद भोकरे व युवा जिल्हाध्यक्ष गणेश लठाड यांनी सर्वांचे आभार मानले. समाजासाठी सदैव तत्पर राहणार असून आदिवासी समाजाच्या कोणत्याही अडचणी व समस्या असल्यास बुलढाणा जिल्हाध्यक्ष विनोद भोकरे , खामगाव मो. 9021889488 तर युवा जिल्हाध्यक्ष गणेश लठाड गणेशपूर ता. खामगाव मो.9767446976 या नंबरवर संर्पक साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी लढत राहणार- जिल्हाध्यक्ष विनोद भोकरे
खामगाव – “जय बिरसा जय आदिवासी” असे म्हणत आदिवासी समाज अजूनही खुप मागासलेला आहे. आदिवासी समाजाला प्रबोधन व जागृत करण्याची अत्यंत गरज आहे. जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा , क्रांतीविर सोमा डोमा आंध यांच्यासह आदिवासी महापुरुषांनी आदिवासी समाजाला न्याय देत बलिदान दिले. त्यांच्या कार्याला नमन करुन सदैव आदिवासी समाजाच्या विकासासाठी तसेच सर्वांगीण प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता, संरक्षणासाठी व शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी लढत राहणार अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष विनोद भोकरे यांनी दिली.युवा जिल्हाध्यक्षपदी गणेश लठाड यांची नियुक्ती







