नेरूळ : नवी मुंबई (प्रतिनिधी ) -: मुंबई बोलले की माणसाला मोठ – मोठ्या इमारतीची आठवण आल्या शिवाय राहत नाही. परंतु याच मोठ्या बिल्डिंग कधी कधी घातक सुद्धा ठरू शकतात. नेरूळ येथील एक जुनी बिल्डिंग एका नवीन बिल्डरने घेतली असून इमारत जुनी असल्यामुळे इमारत तोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याच जुन्या इमारतीच्या बाजूला रहिवासी वस्ती असून छोटे छोटे दगड कधीही आणि कुठेही पडू शकतात. त्यामुळे तेथील रहिवासी नागरिकांना त्यांनी राहत असलेल्या नागरिकांची सुरक्षितता व त्या ठिकाणी जाळी लावणे आवश्यक आहे. असे न केल्यास छोट्या दगडामुळे सुद्धा एखाद अनुचित घटना घडू शकते. त्यामुळे जुनी इमारत तोडताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.







