नाशिक (महाराष्ट्रनिती न्यूज) :- सध्या सोशल मीडियावर “अनिल उपाध्याय” नावाच्या एका कथित काँग्रेस तर कधी भाजप आमदाराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, “महाराष्ट्रनिती” ने या व्हिडिओची सखोल चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं आहे या व्हिडीओ मधील “अनिल उपाध्याय” नावाचा कोणताही आमदार अस्तित्वातच नाही!

🧐 व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हॉटेल मधील देशातील राजकीय घडामोडींवर उघडपणे टीका करताना दिसतो. तर टेबल वर दारूच्या बॉटल असून एका महिलेसोबत अर्ध नग्न कपड्यावर नाचत असताना दिसत आहे. तर या व्यक्तीला “अनिल उपाध्याय – काँग्रेस MLA” म्हणून ओळख दिली जात आहे. परंतु, हे संपूर्णपणे चुकीचे आहे.
🧾 फॅक्ट चेकिंग संस्थांचं मत
Alt News, Boom Live, Factly सारख्या सत्यतपासणी संस्थांनी यासंबंधीचे आधीचे व्हिडीओ फेक असल्याचं सिद्ध केलं आहे. काही व्हिडीओंमधील व्यक्ती “Munna Pandey” किंवा “Vinay Kumar Singh” आहेत, जे सामान्य नागरिक किंवा इतर संघटनांचे कार्यकर्ते आहेत — आमदार नाहीत.
📢 सामाजिक जबाबदारी कुणाची?
फेक माहिती पसरवणे हा सायबर गुन्हा ठरू शकतो. कोणताही व्हिडीओ शेअर करण्याआधी त्याची सत्यता पडताळणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे.
📌 “महाराष्ट्रनिती” चे नागरिकांना आवाहन
> “व्हायरल व्हिडीओ पाहून विश्वास ठेवण्याआधी, एकदा सत्य पडताळा. चुकीची माहिती ही जनतेच्या मनात संभ्रम व विष पसरवू शकते.”








