कॅनडा (वृत्तसंस्था ):-प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने नुकताच कॅनडामध्ये Kap’s Café सुरू करत मोठ्या थाटात उद्घाटन केले होते. पत्नी गिन्नीसोबत कपिलने कॅफेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत नव्या प्रवासाची सुरुवात केली होती. मात्र या कॅफेवर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला असून, १०-१२ गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅफेच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवरून, पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे तसेच कॅनडा पोलिसांचे आभार मानण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे खलिस्तानी घटकांचा संभाव्य सहभाग असल्याचे बोलले जात आहे.








