MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- ना. प्रतापराव जाधव

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या भेटीने बुलढाणा जिल्ह्यातील 49 पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

बुलढाणा(प्रतिनिधी) : जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर अडकुन पडलेल्या पर्यटकांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन भेट घेत संवाद साधला. तर पर्यटकांना घरी सुखरुप पोहचविण्यासाठी विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल या पर्यटकांना 24 एप्रिल रोजी दिल्ली येथे आणण्यात येणार आहे.

जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहे. मृतकांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत. शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि कश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले होते, लवकरात लवकर घराकडे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 49 पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनांसाठी गेलेले आहेत. हे सर्व पर्यटक सुखरुप आहेत. आज 24 एप्रिलच्या सकाळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू-काश्मीरला गेले. पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे, असे पर्यटकांना सांगतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल. आज 24 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता जम्मू कश्मीर वरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना झाले आहे. दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या घराकडे पोहचणाऱ्या रेल्वेने त्यांना पाठवल्या जाणार आहेत. या सर्व पर्यटकांसाठी विशेष रेल्वे बोगी उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी अनेक पर्यटकांनी व पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता. त्यांना घरी सुखरुप पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गृहमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts