नांदुरा (प्रतिनिधी ):- प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू शाखा बाहेकर नगर, नांदुराच्या वतीने विश्वबंधुत्व दिवस, राजयोगिनी दादी प्रकाशमनीजी यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त २५ ऑगस्ट सोमवार रोजी ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रामध्ये आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ४८ जणांनी रक्तदान केले.

तत्पूर्वी नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव, नांदुरा तहसीलदार अजित जंगम, अनंतराव उंबरकर, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मीनारायण जयस्वाल, लायन्स क्लब नांदुराचे अध्यक्ष डॉ शरद पाटील, ओमसाई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, नांदुरा सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी सोनूदीदी यांचेसह सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी एकूण 48 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून रक्तदान केले. यावेळी नांदुरा सेवा केंद्राच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबिराला भाजप नेते शिवाजीराव पाटील, भाजपा नांदुरा तालुका अध्यक्ष विकास इंगळे, निमगाव ग्रामपंचायत सदस्य योगेश चावरे, कैलास चरखे, गजाननराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे नांदुरा सेवा केंद्राच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तर अकोला रक्तपेढीच्या टीमने सदर रक्तदान शिबिरास उपस्थित राहून विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय माउंट आबू शाखा बाहेकर नगर नांदुराच्या संयोजिका ब्रह्मकुमारी सुलभादीदी यांचे मार्गदर्शनात ब्रह्माकुमारी सोनू दीदी, ब्रह्माकुमार संदीपभाई, महेंद्रभाई, गजाननभाई यांच्यासह नांदुरा सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते परिश्रम घेत होते. कमी वेळात आयोजन करूनही सदर रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.








