हिवरा आश्रम (प्रतिनिधी ):- गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शोधपत्रकारितेमुळे परिचित असलेले दै. देशोन्नतीचे हिवरा आश्रम प्रतिनिधी तथा पत्रकार समाधान म्हस्के यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिपित्यर्थ आयोजक सचिन खंडारे विकास सुखदाने यांनी अनिकेत सैनिकी शाळेमध्ये एका बहारदार कार्यक्रमाचे साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा या ठिकाणी उत्सव यशाचा सन्मान कर्तुत्वाचा या उपक्रमांकअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा 16 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र पत्रकार समाधान म्हस्के यांनी हिवरा आश्रम सारख्या छोट्याशा खेड्यामधून 2004 रोजी पत्रकारितेला सुरुवात केली आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील समस्या अडचणीला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले तसेच कष्टकरी व शेतकरी हितासाठी आपली लेखणी सदोदित चालवली असून त्यांनी अनेक ज्वलंत मुद्दे देशोन्नतीच्या माध्यमातून हाताळून त्यात सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. अल्पावधीतच आपल्या विधायक पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. पत्रकार समाधान म्हस्के यांच्या विधायक पत्रकारितेची दखल घेत त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.








