खामगाव (प्रतिनिधी): – आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी आज 3 जुलै रोजी खामगाव येथून ‘विठ्ठल दर्शन एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वे “माऊली, माऊली” च्या मोठ्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली. या पहिल्या फेरित एकूण १६२९ भाविक सहभागी झाले होते. रेल्वेला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, सागर फुंडकर, ज्ञानेश्वर पाटील, तेजद्रासिंह चौहाम, स्वप्नील ठाकरे, किशोर आप्पा भोसले, संजय बगाडे, संभाजी टाले यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वारकऱ्यांना खामगावकरांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’च्या गजरात हजारोंच्या संख्येने निरोप दिला.

रेल्वे स्टेशन परिसरात भक्तीरसात न्हालेली गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजरात गाणारे वारकरी, व विविध संघटनांकडून करण्यात आलेले अल्पोपहार व पाण्याचे वाटप यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता. गेल्या सात वर्षांपासून खामगावहून आषाढी एकादशीसाठी ही विशेष रेल्वे सेवा सुरु असून यंदाही बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या पहिल्या फेरितून विभागाला ६ लाख ३२ हजार ३५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून यामध्ये सर्वसाधारण, राखीव व वातानुकूलित तिकिटांचा समावेश आहे. या पवित्र यात्रेच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी स्थानिक, सामाजिक संस्था आणि प्रशासनाचे योगदान उल्लेखनीय होते.
खामगांव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर वारी करणाऱ्या वारकरी बांधवांचे भजन, टाळ, वीणा, मृदुंगाच्या गजरात स्वागत व सन्मान सत्कार करण्यात आले सोबतच वारकरी बांधवांना फराळाचे वाटप सुध्दा करण्यात आले या प्रसंगी सर्व काँग्रेस परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारकऱ्याचे दर्शन घेण्यासाठी केंद्र शासनाने खामगाव येथून भाविक भक्तांसाठी विशेष रेल्वेची सोय केली होती त्या रेल्वेने जाणाऱ्या भाविकांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार )वतीने भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. हजारो वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्याची आस लागली आहे त्यामुळे खामगाव रेल्वे स्थानकावर भक्ती मे वातावरण होते या भक्तीमय वातावरणात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या कपाळी टिळा आहे. भगवी टोपी घालून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय बगाडे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला . शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ,राज्यातील पाऊसमान चांगले पडू दे, अशी या चला सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाकडे करण्यात आली व हसत मुखाने हजारो वारकऱ्यांना दर्शनासाठी निरोप देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरद पवार ) पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








