खामगाव(प्रतिनिधी ): -शासकीय किमान आधारभूत किंमत योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाची असून त्यांच्या शेतमालाला न्याय दर मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री ऍड.आकाश फुंडकर यांनी दिली.

खामगाव तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वतीने शासकीय गोडाऊन येथे 10 मे 2025 रोजी शासकीय किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मक्का व ज्वार खरेदीचा शुभारंभ ना. फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात परंपरेनुसार ना.फुंडकर यांच्या हस्ते वजन काट्याच्या पूजनाने करण्यात आली. व ना.श्री.आकाशदादा फुंडकर कामगार मंत्री यांचा सस्स्थेचे वतीने विठ्ठलराव लोखंडकार यांनी शाॅल श्रीफळ पुष्पमाला घालून सत्कार करन्यात आला यावेळी यावेळी बोरी अडगाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांचा ना. फुंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत विठ्ठलराव बा. लोखंडकार, गोदावरीताई ढोण, प्रमिला वानखेडे, प्रमोद अग्रवाल, केतन पेसोडे, गोपाळराव चव्हाण, अशोक हटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे, खविसं सचिव मनोहर बोराडे, तहसीलदार सुनील पाटील, सहाय्यक निबंधक गारोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गजानन आमले, गोडाऊन व्यवस्थापक खराटे, नरेंद्र शिंगोटे, उमेश ढोण, बळीराम वानखेडे, मयूर निकुले, श्याम साखळकर, अक्षय पाटील, चंद्रकांत पवार, नितीन भिसे यांच्यासह खामगाव तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेचे संचालक, विविध शेतकरी प्रतिनिधी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








