खामगाव :- ( प्रतिनिधी) अज्ञात चोरट्यांनी शाळेचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करीत साहित्य व रोख रकमेसह 1 लाख 69 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना 30 जुलै रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव – शेगाव रोडवरील एसएसडीव्ही शाळेत ३० जुलैच्या मध्यरात्री चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या मागील दरवाजाचा कडीकोडा तोडून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम, हार्डडिक्ससह एकूण १,६९,१९५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयात प्रवेश करून ड्रॉवरमधील रोकड आणि संगणकातील हार्डडिक्स चोरल्या. ही बाब शाळेतील कर्मचारी सकाळी शाळा उघडण्यासाठी आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली असून, खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाळा, मंदिरे, धार्मिक व सामाजिक संस्थांमध्येही आता चोरट्यांचे लक्ष केंद्रीत होत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. तालुक्यात चोऱ्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी करण्याची गरजही या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.








