खामगाव(प्रतिनिधी) तालुक्यात शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला असून तो पिक विमा काही बँकांनी कर्ज खात्यामध्ये वळता केला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ वळती केलेल्या रक्कम पिक विमा मध्ये जमा करावा अन्यथा राष्ट्रवादीकाँग्रेस पक्ष (शरद पवार) बँकांना टाळा ठोकून आंदोलन करणार असा इशारा तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

शेतकऱ्यांना संकटाच्या काळात पिक विमाच्या आलेल्या पैशाचा उपयोग करता आला नाही. आता पेरणीचे दिवस असून शेतकऱ्याकडे पैसे नाहीत पिकविम्याचे आलेले पैसे कर्ज खात्यात वळते करण्यात आले त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे बँकेकडून शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावर त्रास देण्याचे काम सुरू आहे त्यामुळे आमच्याकडे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे खामगाव तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात वळती केले असून ते आलेले पैसे शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे अन्यथा ज्या बँकांनी शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे कर्ज खात्यात वळवले आहेत त्या बँकांना टाळे ठोकू असा आंदोलनाचा इशारा उपविभागीय अधिकऱ्यांना निवेदनाद्वारे यावेळी देण्यात आला आहे








