खामगांव(प्रतिनिधी) : एकनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा गौसेवक, रक्तदान हेच श्रेष्ठ दान असा संदेश देत रक्तदान करून रुग्णाची सेवा करणारे सुरज भैया यादव यांना झारखंड येथे 24 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात संघर्ष ज्योती आंतर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने खामगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेल्या.

गौवंश सेवा व तसेच रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आता पर्यंत एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन तर्फे 18 हजाराच्या वर रुग्णांना रक्ताची मदत करून एक नवीन संजीवनी देण्याचे काम ही संस्था गेल्या मागील 2013 पासून करत संपूर्ण भारत देशात एक आपली वेगळी ओळख निर्माण करत आलेली आहे. याच कार्याची पावती म्हणून धनबाद स्थित हॉटेल संबोधी रेस्टॉरेन्ट मधील एका मोठ्या हॉल मध्ये 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय सम्मान समारोह रोटी बँक धनबाद भुली ब्लड डोनर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी झारखंड प्रदेश अध्यक्ष तथा पूर्व मुख्यमंत्री झारखंड रघुवर दास व पूर्व राज्यपाल ओडिसा तथा आमदार राज सिन्हा धनबाद, सौ.शारदा सिंग जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद धनबाद, सुनयना सिंग तृतीयपंथी, रवि सिंग, रवि शेखर यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय संघर्ष ज्योती पुरस्कारानी शिल्ड प्रमाणपत्र देऊन सुरज शिवमुरत यादव खामगांव महाराष्ट्र राज्य यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी देश विदेशातील सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकनिष्ठा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शेखर रिछारीया यांनी धनबादच्या पावन भूमीवर वर 41वे रक्तदान केले अशी माहिती प्रदीप शमी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.








