खामगांव (मिर्झा अक्रम बेग) : शिंदे -पवार -फडणवीस सरकार म्हणजे जनतेचे सरकार असे म्हणणाऱ्या आमदारांच्या लाडकी बहिण योजने अंतर्गत सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाच्या नावावर खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराकडून हातात पोलिसी दांडा घेवून रोजंदारी करणारी सामान्य जनता वेठीस धरली जात आहे. अतिक्रमणाचे कारण सांगून कार्यक्रमाला कोणताही त्रास नसताना रोडवरील महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरणारे ऑनलाईन सेंटर केले बंद.. दुकान चालकावर कारवाईची धमकी देत केली हातपाय जोडण्याची भाषा… खामगाव शहरात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना उत् आला असताना ठाणेदार चुप्पी साधत आहेत. फक्त सामान्य जनता आणि ऑटो चालकांना धरतो वेठीस. माईक मधून चालकांना देतो शिव्या. जनतेचे रक्षण करणारा ठाणेदार हा ? आमदाराचा की जनतेचा… महिला लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी येत असताना ऑनलाईन सेंटर पाडले बंद.. मोलमजुरी करणाऱ्या सामान्य जनतेच्या पोटावर पाय देणे खरोखर योग्य आहे का? पोलिसांना आमदाराच्या कार्यक्रमाचे नियोजन माहित असताना ठाणेदारांनी एक दिवस आधीच सूचना देवून दुकान बंद ठेवण्याचे सांगणे आवश्यक होते मात्र असे ना करता दादागिरी करीत ठाणेदार आपला रुबाब दाखवत हातात पोलिसी दांडा घेवून अरेरावीची भाषा करून वेळवर दुकान बंद करण्याचे सांगितले. त्यामुळे साहित्याचे नुकसान झाले. पोटा पुरते कमावत असताना साहित्याचे नुकसान झाल्याने जबाबदार कोण? आमदार की ठाणेदार? ही नुकसान भरपाई कोण भरून देणार? पोलीस आहे म्हणून कोणालाही कारवाईची धमकी देणे आणि शिवीगाळ करणे हेच ठाणेदार यांचे कर्तव्य आहे का? मात्र हेच ठाणेदार शहरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्या विरोधात चुप्पी साधत आपले आर्थिक संबंध जोपासत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक , डीवायएसपी कारवाई करणार का? या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजने अंतर्गत सन्मान नारी शक्ती योजनेचा कार्यक्रम हा 24 जुलै रोजी येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर मैदानांवर पार पडला आहे. त्यासाठी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्याकडून खामगाव मतदार संघातील महिलांना बसण्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नाचनकर यांना आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या सरकारच्या लाडकी बहिण योजने अंतर्गत सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे नियोजन अनेक दिवसांपासून माहीत होते. मात्र ठाणेदार यांनी सुरक्षेच्या कारणावरून स्थानिक कार्यक्रम समोरील दुकानांना एक दिवस आधीच म्हणजेच 24 तारखे अगोदर दुकान बंद ठेवण्याची सूचना देणे बंधनकारक होते. मात्र खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नाचनकर यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता कार्यक्रमाच्या 5 मिनिट अगोदर अचानक येऊन दुकान 5 मिनिट मध्ये बंद करा असे सांगत दादागिरी अरेरावीची भाषा करीत दम देतात. आणि मग एखादी दुकान चहाची किंवा खाद्य पदार्थाची असेल ती अशी कशी बंद करता येईल त्याला आवरा- आवर करुन सगळं साहित्य व्यवस्थित ठेवावी लागतात अन्यथा त्या दुकांचे नुकसान होणार याचा जराही विचार न करता ठाणेदार साहेबांचा हुकूम म्हणून एखाद्याने आपल्या दुकानातील साहित्य खराब करून स्वतःचे नुकसान करून घ्यावे अश्या प्रकाराची हुकूमशाही आज ठाणेदार नाचनकर यांच्या कडून होताना दिसून आला हे. सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमासाठी गरीब सामान्य जनतेचे नुकसान करावे हे आता कायम दिसून येत आहे. स्थानिक कार्यक्रमाचे नियोजन हे पूर्व नियोजित असताना कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पूर्ण सूचना देऊन त्यांनी दुकान बंद करायला सांगणे उचित होते. परंतु आणीबाणीची परिस्थिती असल्या सारखे 5 मिनिट मध्ये दुकान बंद करायला लावणे हे जाणूनबुजून केल्याचे वाटत आहे. तसेच ठाणेदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने समोरील व्यक्ती आपणास सभ्यपणे बोलत असताना सर सर म्हणून बोलत असताना सुद्धा समोरचा सुशिक्षित आहे का? त्याची सामाजिक प्रतिष्ठा आहे का नाही याचा न विचार करता समोरच्याला हातात पोलिसी दांडा घेवून दादागिरी करीत उद्धटपणे बोलून अरेरावी करून बोलणे हे योग्य आहे का? की पोलिस अधिकारी या पदाला सगळ्यांना आरे कारे करून एकेरी भाषेत बोलण्याची मुभा दिली आहे असा प्रश्न निर्माण होतो.

विशेष म्हणजे शहरात अवैध धंद्यांना उत् आला आहे. वरली मटका जुगार जोमात सुरू आहे तर गुन्हेगारी वाढली आहे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहे. अवैध रेती वाहतूक जोमात सुरू आहे. त्यामुळे 4 दिवसा अगोदर एका अल्पवयीन मुलाला टिप्परने धडक दिल्याने जीव गमवावा लागला. हे ठाणेदार नाचनकर यांना अवैध धंदे दिसत नाही . अवैध धंद्या विरोधात चुप्पी साधत आहे. मात्र आमदरासमोर आपली वाहवाही व्हावी यासाठी सामान्य जनतेवर दादागिरी करून त्यांना उद्धटपणे बोलून त्यांचे नुकसान करून कारवाईची धमकी देत हातपाय जोडण्याची भाषा करण्याची उपरती सुचते तरी कशी? हेच ठाणेदार हे कारवाईच्या नावावर बस स्थानक परिसरात ऑटोचालकाना शिवीगाळ करतात. मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. हेच नाचनकर ठाणेदार अन्न हे पूर्ण ब्रह्म असताना नाष्टा गेला….. भो.$$$$त असे स्वत:च्या कर्मचाऱ्यांना म्हणतात. या सर्व प्रकाराला वरिष्ठांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खामगाव शहरात एक अप्पर पोलीस अधीक्षक आणि डी वाय एस पी असताना ठाणेदार यांची सामान्य जनतेवर होणारी अशी दादागिरीला पाठिंबा तर नाही ना?
बुलढाणा जिल्ह्याला सुनील कडासाने यांच्यासारखे जिल्हा पोलिस अधीक्षक लाभले आहे जनतेची आणि क कर्मचाऱ्याची जान असणारे अधिकारी असताना ठाणेदार नाचनकर मात्र जनतेला पायाची धूळ समजून विनाकारण कारवाईची धमकी देत हातपाय जोडण्याची भाषण करतात. ही खूप खेदाची बाब आहे. खामगाव अवैध धंदे करणाऱ्यांची पाठराखण करून सामान्य जनतेला पायाची धूळ समजणाऱ्या ठाणेदार नाचनकर यांना कर्तव्यदक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर , जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासाने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, डिवाएसपी ठाकरे.. हे कारवाई करतील की त्यांची पाठराखण करतील हे येणारा काळ ठरवेल एवढे मात्र खरे!








