पिंपळगाव राजा( प्रतिनिधी ):- खामगाव तालुक्यातील निपाणा येथील प्रवासी निवाऱ्यापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत मुख्य मार्ग चिखलमय झालेला असून विद्यार्थ्यांना शाळेत याच मार्गाने जाण्याने करावे लागते व सध्या हा रस्ता चिखलमय झालेला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाट चिखलमय झाली असून त्रास सहन करावा लागत आहे .

खामगाव तालुक्यातील निपाणा ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमार्गाची दुर्दशा झाली असून निपाना येथील नागरिकांची अशी मागणी आहे की रस्त्याचे दोन्ही बाजूला नाली व काँक्रिट रस्ता बनवण्यात यावा मुख्य मार्ग जाण्या येणे योग्य बनवावा जेणेकरून त्या मार्गाने जाणारे विद्यार्थी गावातील नागरिक व्यावसायिक आणि वृद्ध यांना त्रास होणार नाही . सध्या तो मार्ग चिखलमय झालेला असून जाण्या-येण्या योग्य नाही तरी गावकऱ्यांची अशी मागणी आहे की या रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालय निपाणा यांनी लक्ष देण्याची गरज आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला तक्रार सुद्धा दिली आहे तरी या गंभीर विषयाकडे लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन यांनी लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी ग्रामस्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे.








