MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्यासह विविध मागण्यांसाठी मनसेचे न.प.समोर आंदोलन

आंदोलनाला विविध राजकीय पक्ष व संघटनांनी दर्शविला जाहीर पाठिंबा

खामगाव(प्रतिनिधी):- मागील काही दिवसापुर्वी खामगाव शहरात नगर परिषदेकडून अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविण्यात आली होती. यावेळी शहरातील गोरगरीब अतिक्रमणधारकांच्या दुकानांवर बुल्‍डोजर चालविण्यात आला होता. त्‍यामध्ये अनेक गोरगरीब अतिक्रमणधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. व ज्‍या भागातून सदरचे अतिक्रमण काढण्यात आले. तिथे तार कंपाउड करण्यात आल्‍याने अतिक्रमण धारकांवर उपासमारीची वेळ आल्‍याने शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना त्‍यांच्या जुन्या जागेवरच गाळे/ दुकाने अल्‍पदरात बनवून द्यावे किंवा त्‍यांना पर्यायी जागा उपलब्‍ध करुन द्यावी यासह अतिक्रमणधारकांच्या विविध मागण्यांसाठी आज २५ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिक्रमणधारकांनी तसेच शहरातील विविध राजकीय पक्षांनी व त्‍यांच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनास पाठींबा दर्शविला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संजय पळसकार सहकार सेना राज्‍य उपाध्यक्ष, अशोक पाटील जिल्‍हा उपाध्यक्ष, जयसराम सातव तालुकाध्यक्ष, आनंद गायगोळ शहराध्यक्ष, आकाश पाटील शहर उपाध्यक्ष, आकाश वानखडे तालुका उपाध्यक्ष, सागर भोपळे तालुका उपाध्यक्ष, सागर हरसुले विद्यार्थी सेना, सोनु खपसे तालुका संघटक, करण दिक्षित शहर उपाध्यक्ष, कामगार सेनेचे विनोद इंगळे, नरेंद्र म्‍हस्‍के, विजय मांडवेकर, निलेश श्रीनाथ, गजानन घ्यार, दिपक सुलताने, भागवत उगले, सागर जगदाळे आदि मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. तसेच अतिक्रमणधारकांमध्ये देवा उबाळे, अण्णा नागेश्वर, प्रितम माळवंदे, विक्‍की जैन, पियुष चव्‍हाण, रवि माळवंदे, निलेश बिबे, संतोष काकडे,सोनु चव्हाण,पवन माळवंदेसह मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी या आंदोलनाला, खामगाव बेरोजगार अतिक्रमण धारक संघटना, उ.बा.ठा. शिवसेना महिला आघाडी, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, शिवसेना खामगाव तालुका उ.बा.ठा गट, शिवसेना शिंदे गट, प्रहार जनशक्ती पक्ष यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला.

काँग्रेसचा पाठिंबा व मागणी

नगर परिषद खामगांवच्या समोर बेरोजगार अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खामगाव शहराध्यक्ष आनंद भाऊ गायगोळ यांच्या वतीने एक दिवसीय आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला खामगांव विधान सभा काँग्रेस कमिटी समन्वयक नाना साहेब पाटील यांच्या व खामगांव शहर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष स्वप्निल दादा ठाकरे पाटील यांच्या संमतीने खामगाव शहर काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. सर्व बेरोजगार अतिक्रमण धारकांना नको मुख्याधिकारी नगरपरिषद खामगाव च्या वतीने गैरकायदेशीररित्या राबविलेल्या अतिक्रमण मोहीम मध्ये अतिक्रमण धारकांचे जे नुकसान झाले आहे. त्या नुकसानाची भरपाई मिळावी व शक्य होईल तर अतिक्रमण धारकाना त्याच जागेवर व्यवसाय करण्या करिता जागा द्यावी. तसेच फेरीवाल्याकरिता व इतर बेरोजगार अतिक्रमण धारक दुकानदारांना करिता पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व ही जागा बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा येथे बेरोजगार अतिक्रमणं धारकांना कोणत्याही प्रकारचे डीपॉजीट न घेता नाममात्र हजार रुपये दर महा शुल्क आकारून बुलढाणा शहरांतील मुख्य रस्त्याच्या कडेला दुकाने बांधुन देण्यात आली आहेत. याच प्रमाणे खामगांव शहरात सुध्दा बेरोजगार अतिक्रमण धारक दुकानदारांना फक्त नाम मात्र एक हजार रुपये मासिक शुल्क अकारून दुकाने देण्यात यावी. ही मागणी सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून खामगांव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्याध्यक्ष किशोर आप्पा भोसले यांनी केली आहे.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts