खामगाव (प्रतिनिधी ):- बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील मांडका या गावातील एका 27 वर्षीय युवा शेतकऱ्याने अवैध सावकाराच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मांडका येथील शिवाजी सातव या युवा शेतकऱ्यांने अवैध सावकार विपुल गायगोळ, शुभम गायगोळ यांच्या कडून व्याजाने काही पैसे घेतले होते. मात्र पैश्याचा परतावा थोड्या दिवसात करतो, असे शिवाजीने सांगितले होते मात्र कुठलंही न ऐकत अवैध सावकाराने चक्क शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली म्हैस व्याजाच्या पैश्यात ताब्यात घेतली आणि शेतात उभी असलेली म्हैस सोडून नेली. त्यामुळे युवा शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करून जीवन संपविले. विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्यांच्या वडिलांनी ही 2006 मध्ये कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली होती.
अवैध सावकार हा तलाठीचा पुतण्या असून तलाठ्याचेच पैसे हा अवैध सावकारीतुन वापरत आहे. अवैध सावकारी मधून युवा शेतकरी शिवाजी सातव याने आत्महत्या केली. त्या बाबत पिंपळगाव राजा पोलिसात तक्रार देखील देण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी अवैध सावकाराशी आर्थिक देवाणघेवाण करून आरोपीला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप आत्महत्या ग्रस्त कुटुंबियांना पोलिसांवर पत्रकार परिषद घेवून केला आहे. अवैध सावकारीच्या पैश्यासाठी मृतक शिवाजी सातव यांच्या शेतातून सावकाराने बांधलेली म्हैस उचलून नेली आहे. त्याचाच धसका घेत शिवाजी सातव याने आत्महत्या केली असून अवैध सावकार विपुल गायगोळ,शुभम गायगोळ यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्ह्यासह सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा. अशी मागणी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाने पत्रकार परिषद मध्ये केली आहे. अन्यथा 15 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावर कुटुंबासह आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबीयांनी घेतला आहे.
त्या कुटुंबाचे आर्थिक पुनर्गठन करून अवैध सावकाराला बेड्या ठोका- संजय बगाडे
खामगाव:- तालुक्यातील मांडका या गावात अवैध सावकाराचा जाचाला कंटाळून एका 27 वर्षीय युवा शेतकऱ्यांने आत्महत्या केली त्यावर कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकार आणि सरकार मधील मंत्र्यांना सोयरसुतक नाही ही शोकांतिका आहे. निवडणूकच्या वेळी मताची भीक मागणारा एकही पुढारी अजूनही त्या शेतकरी कुटुंबाच्या भेटीला आला नाही. मात्र त्या आत्महत्या ग्रस्त कुटुंबाच्या मागे खंबीर पणे राष्ट्रवादी (शरद पवार ) उभी असून तलाठ्याचे पैसे सावकारी मध्ये वापरणाऱ्या तलाठ्याच्या पुतण्या विपुल गायगोळ, शुभम गायगोळया अवैध सावकारावर गंभीर गुन्हे दाखल करा. व आत्महत्या गस्त कुटुंबाचे आर्थिक पुनर्वसन करा. अशी आमची मागणी असून आरोपींना तात्काळ अटक करा. अशी आमची मागणी आहे अवैध सावकारीच्या व्यवहारातून त्या सावकाराने शेतात उभी असलेली म्हैस ही उचलून नेली ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी कुठलीही हलगर्जीपणा न करता तात्काळ या कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा गाठ ही राष्ट्रवादी शी आहे. असा इशारा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी दिला. त्यावेळी जेष्ठ नेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे, विधानसभा अध्यक्ष धोंडीराम खंडारे, गजानन धंदरे, कार्याध्यक्ष संतोष पेसोडे, डॉ रावनकार, आशिष ठाकरे उपस्थित होते.








