खामगाव (प्रतिनिधी): – प्रेयसीचा चाकूने भोसकून खून करुन प्रियकराने स्वत: वर चाकूने वार करून आत्महत्या केली. 23 सप्टेंबर रोजी खामगाव नजीक सजनपुरी येथील जुगनू हॉटेलमध्ये 23 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास थरारक हत्याकांड उघडकीस आले. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. तर पोलीस तपास करीत आहे. जुगनू हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दोन्हीही प्रेमीयुगुल साखरखेर्डा परिसरातील रहिवासी आहे. तर घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव झाला होता.

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील सोनू राजपूत वय २२ व ऋतूजा पद्माकर खरात, रा.शिंदी, ता. सिंदखेडराजा हे प्रेमीयुगुल खामगावजवळील सजनपुरी येथील हॉटेल जुगनूमध्ये थांबले होते. दरम्यान, काही कारणावरून त्या दोघांमध्ये वाद होऊन कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती आहे. यामध्ये सोनू राजपूत याने ऋतुजाला चाकूने भोसकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर सोनू राजपूत यानेदेखील त्याच चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली. ऋतूजा पद्माकर खरात शिंदी ही युवती खामगाव येथील पॉलिटेकनीक कॉलेजला शिकत असून, सोनू राजपूत व ऋतूजा पद्माकर खरात या दोघांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे, तर हे दोघे जुगनू हॉटेलमध्ये ते वारंवार येत असल्याचेही कळते आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती वार्याीसारखी पसरताच खामगाव शहरात खळबळ उडाली व मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, डीवायएसपी प्रदीप पाटील, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आदींसह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या व मृतदेह ताब्यात मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले. दोघांतील कडाक्याच्या भांडणातून चाकूने भोसकून हे हत्याकांड घडले असावे, असा पोलिसांचा कयास असून, अधिक तपास खामगाव शहर पोलिस करत आहेत.








