खामगाव (पद्माकर धुरंधर):- प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा माजी ना. बच्चु कडु यांनी दिव्यांग, शेतकरी व शेतमजुरांच्या मागण्यांसाठी अमरावती ते यवतमाळ पदयात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला नागरिकांकडून पाठींबा मिळत आहे. तर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी १४ जुलै २५ रोजी विराट मल्टीपर्पज फाउंडेशन व प्रहार दिव्यांग सेलच्या १० कार्यकत्यांनी मुंडन केले. तसेच शिव मंदिरात जलाभिषेक केला. बच्चु कडु यांच्या मागण्यांची पुर्तता करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात दिव्यांग निराधार अनुदान 6000 करणे व शेतकरी कर्जमाफी करणे, दिव्यांग, शेतकरी शेतमजुरांचे कैवारी बच्चुभाऊ कडू यांनी अमरावती ते यवतमाळ अशी पदयात्रा काढलेली आहे. या यात्रेमध्ये मांडलेल्या विविध मागण्याची अंमलबजावणी प्रभावीपणे संपूर्ण राज्यात तत्काळ व्हावी. वाढत असलेली महागाईवर मात करण्यासाठी समाजातील शोषित वंचित असलेल्या घटकासाठी वेळोवेळी विविध पक्ष संघटना, सामाजिक संघटना यांनी दिव्यांग, विधवा, निराधार, यांच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी, अशी मागणी विविध निवेदने आंदोलनाच्या माध्यमातून लाऊन धरली होती.त्या आंदोलनाची दखल घेत 6 हजार रुपये करणे गरजेचे आहे. तसेच शेतकरी कर्ज माफी व्हावी, अशी मागणी विविध पक्ष, संघटनांनी केली आहे. मात्र त्या मागणीची दखल सरकार कडून घेण्यात आली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यासह विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या मागण्याची दखल घेण्यात यावी असे निवेदनात नमूद आहे. यावेळी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी १४ जुलै २५ रोजी विराट मल्टीपर्पज फाउंडेशन व प्रहार दिव्यांग सेलच्या १० कार्यकत्यांनी मुंडन केले. तसेच शिव मंदिरात जलाभिषेक केला. यामध्ये प्रहार जनशक्ती शहराध्यक्ष शत्रुघन इंगळे दिव्यांग शक्तीचे शेखर तायडे मिलिंद धुरंधर गजानन देवगिरीकर दीपक चिकाने विनोद पवार अमोल वसे सिद्धात अंभोरे मनोज पालीवाल यांनी मुंडन केले. तर निवेदन देतेवेळी विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे मनोज नगरनाईक, प्रहार जनशक्ती शहराध्यक्ष शत्रुघन इंगळे, दिव्यांग शक्तीचे शेखर तायडे, पद्माकर धुरंधर, मिलिंद धुरंधर, गजानन देवगिरीकर, दीपक चिकाने, विनोद पवार, अमोल वसे, सिद्धांत अंभोरे, मनोज पालीवाल, मिलिंद मधुपवार, अभय जोध, अजय तराळे, महेंद्र छंगानी, संतोष आटोळे, सुनील टिपकरी, मोहम्मद रईस, पुरुषोत्तम अग्रवाल, वसंत चिखलकर, सचिन डोबाळे, श्रीकृष्ण भागवत, बापू दामोदर, मनीष तांबटकर, संजय वाशिमकर, गोपाल म्हात्रे, कविताताई इंगळे, पल्लवीताई पाटील, प्रणाली ताई देवगिरीकर, साक्षीताई वाघ आदी उपस्थित होते.








