खामगाव (प्रतिनिधी):- भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी बांधवां विषयी अगदी खालच्या दर्जात बोलुन गरळ ओकून अवमान केल्याप्रकरणी त्यांचा जाहीर निषेध व आमदार बबनराव लोणीकरांना निलंबित करण्यात यावे. तसेच न.प. मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण हटविण्या संदर्भातील शासन निर्णयाचा भंग करुण हिटलरशाही, भेदभाव करून क्रूरतेने व निर्दयतेने खामगाव शहरातील बेरोजगार गोरगरीब नागरीक व युवकांचा रोजगार जेसीपीद्वारे उध्वस्त केल्या प्रकरणी मुख्याधिकारी यांचे निलंबन करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन खामगाव विधानसभा काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुदधा देण्यात आला
.
खामगाव काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव व त्यांच्या परिवाराविषयी अगदी खालच्या दर्जात बोलुन गरळ ओकून या देशातील समस्त शेतकरी बांधवांचा अवमान केला आहे. त्याच्या या वक्तव्याचा काँग्रेसच्या वतीने जाहिर निषेध करीत भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांना तत्काळ निलंबीत करावे अशी मागणी सुध्दा करण्यात आली आहे. तसेच खामगांव शहरात न.प. मुख्याधिकारी यांनी ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला व शेतकरी शेतमजूर कामगार बांधवांच्या शेती पेरणीच्या हंगामाच्या सुरवातीला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीच्या काळात शासनाचा सक्तीचा आदेशात नमुद केल्याप्रमाणे पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण हटविण्यात येवु नये, हा शासन आदेश डावलून नियम बहाय अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अगदी हिटलरशाही, गरीब श्रीमंत भेदभाव करून क्रूरतेने व निर्दयतेने बेरोजगार नागरीक व युवकांच्या रोजगारावर जेसीबी द्वारे तोडफोड करुण अतोनात नुकसान करत बेरोजगारांचा रोजगार हिरावुन घेतला आहे त्याच्या या निर्दयी कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व शासन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न.प. मुख्याधिकारी खामगाव यांना तात्काळ निलंबित करून त्यांचे वर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या न्यायिक मागण्यासंर्दभात तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला. या निवेदनावर काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील, धनंजय देशमुख, तेजेंद्रसिंह चौहान, स्वप्नील ठाकरे, किशोर आप्पा भोसले, अमित तायडे, कैलास फाटे, गवई यांच्यासह काँग्रेस पदाधीकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.








