MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

बुलढाणा नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षकांना गुटखा माफियांची जोरदार सलामी : जिल्ह्यासह खामगावात मध्यप्रदेशातून भेंडवड – भास्तन – जलंब मार्गे गुटख्याची वाहतूक

गुटख्याची वाहतूक होत असलेल्या वाहनाची माहिती देवूनही पोलिसांचे दुर्लक्ष तर एएसपींचा फोन नॉट रीचेबल

खामगाव/ बुलढाणा ( विनोद भोकरे): कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक हे सेवा निवृत्त होताच नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 31 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. मात्र जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत् आला असताना गुटखा माफीयांनी नव्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना जोरदार सलामी देत जिल्ह्यासह खामगावात गुटख्याची खुलेआम वाहतूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात भास्तन – जलंब मार्गे मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक करण्यात येत आहे. गुटखा माफियांना कोणतीच भीती नसल्याने गुटखा वाहतूक जोमात करीत आहे. या गुटखा वाहतुकीबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले तर खामगांव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक यांना फोन केला असता त्यांच्या फोन अगोदर बिझी नंतर नॉट रीचेबल .. मॅसेज देवूनही  पोलिसांनी तत्काळ कोणतीही ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे अवैध धंदे आणि गुटखा माफियांना पोलिसांचे अभय तर नाही?  असा प्रश्न उपस्थित होत असून स्थानिक पोलीस स्टेशन आणि बीट पोलिसांचे आर्थिक संबंध व पोलिसांच्या वरदहस्ताने जिल्ह्यात गुटखा वाहतूक होत तर नाही ना?  असा प्रश्न उपस्थित होत असून  नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का?  अशी  मागणी होत आहे.

बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सुनील कडासने हे 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले तर नागपूर सी आय डी विभागाचे प्रमुख असलेले आयपीएस विश्व पानसरे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पदभार स्वीकारला मात्र कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक कडासाने यांची निवृत्ती होताच अवैध धंद्यांना उत आला आहे. तर गुटखा माफीयांनी खुलेआम गुटख्याची वाहतूक सुरू केली आहे. बुलढाणा जिल्ह्यासह खामगावात मध्यप्रदेशातून जळगाव जामोद – भेंडवड – भास्तन – जलंब मार्गे गुटखा वाहनद्वारे येत आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्य सीमेवर नाका बंदी तसेच त्या मार्गे स्थानिक पोलीस स्टेशन असताना खुलेआम होणारी गुटख्याची वाहतूक ही आश्चर्याची बाब आहे. या मार्गात जळगाव जामोद आणि जलंब आणि खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची हद्द येत असून खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि मलकापूर खामगाव विभागाचे डीवायएसपी यांची देखरेख असते. मात्र एवढा पोलिसांचा फौजफाटा असताना गुटखा माफिया खुलेआम गुटखा वाहतूक करीत आहे.  हे उमजनारी बाब आहे

दरम्यान 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान मध्यप्रदेशातून जिल्ह्यात जलंब मार्गे मालवाहू वाहने क्रमांक MH – 28- A- – – – – – 3 आणि MH- 28 — – – – 57 या दोन वाहनाद्वारे गुटख्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती (नाव न सांगण्याच्या अटीवर)  सूत्रांची दिली . याबाबत पोलिसांना माहिती दिली मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले तर खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांना माहिती देण्यासाठी फोन द्वारे संपर्क केलं असता थोरात यांचा फोन आधी बिझी आला आणि मात्र नॉट रीचेबल झाला. सदर गुटखा वाहतूक करणारी 2 मालवाहू वाहने सायंकाळी 6 : 30 दरम्यान जलंब येथील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळून पास झाली असून खामगाव कडे येत आहे . अशी माहिती व्हॉट्स ॲप द्वारे नंबर सहित दिली. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने दोन्ही वाहने आपल्या नियोजित ठिकाणी कोणताही अडथळा न होता पोहचली. यामुळे अवैध धंदे आणि गुटखा माफियांना पोलिसांचे अभय तर नाही ना? तसेच या मार्गावरील स्थानिक पोलीस स्टेशन आणि बीट मध्ये असणाऱ्या पोलिसांचे आर्थिक संबंध व त्यांच्या पोलिसांच्या वरदहस्ताने जिल्ह्यात गुटखा वाहतूक होत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नव्याने जिल्ह्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या समोर वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे , गुटखा माफिया, रेती माफितांचे आव्हान उभे ठाकले आहे. विशेष  म्हणजे गुटखा माफियांना पोलीस कुठे ड्युटी करीत आहे. कोण येणार आहे? याची सर्व माहिती असते. तर एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर  माहिती दिली  गुटखा माफियांचे  धागेदोरे पोलीस विभागात असून त्यांना पूर्ण माहिती पोलिसांकडून मिळते.   त्यामुळे  गुटखा  माफियांना माहिती देणाऱ्या संबधित कर्मचाऱ्यांचे  आर्थिक संबंध तर नाही ना? हे महत्वाचे आहे.

 

खामगाव विभागात अवैध धंदे जोमात

—————————————————–

खामगाव विभागात अवैध धंदे जोमात सुरू आहेत. वाढती गुन्हेगारी पाहता जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नाही. तर विनयभंग, अत्याच्यार, हाणामारी, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र पोलीस घटनांना रोखण्यात अपयश येत आहे. गुन्हेगारी वाढली असताना गुटखा वाहतूक जोमात सुरू असून पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने रेती माफिया, गुटखा माफिया खुलेआम वाहतूक करून पोलिसांसमोर आव्हान उभे करीत आहे. त्यामुळे नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पानसरे हे गुन्हेगारांवर दबदबा निर्माण करण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे येणारा काळच ठरवेल?

 

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts