खामगाव (प्रतिनिधी): ईद-ए-मिलाद-उन-नबी या पवित्र दिना निमित्त 5 सप्टेंबर रोजी खामगाव येथील मस्जिदमध्ये चिमुकल्यांकडून कुराण पठण करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांचा उत्साह दिसून येत होता.

ईद-ए-मिलाद-उन-नबी हा मुस्लिम समुदायाचा एक महत्त्वाचा सण आहे, जो इस्लामिक कालगणनेनुसार रबी-अल-अव्वल महिन्याच्या १२ तारखेला साजरा केला जातो. या दिवशी इस्लामचे संस्थापक पैगंबर हजरत मुहम्मद यांचा जन्म झाला होता. या दिवशी मुस्लिम लोक एकत्र येऊन पैगंबर मुहम्मद यांचा सन्मान करतात, त्यांच्या शिकवणींचे स्मरण करतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी घरांना आणि मशिदींना फुलांनी आणि दिव्यांनी सजवले जाते, तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मौलाना मोहम्मद इस्माईल यांच्या उपस्थितीत मकतब अशरफिया हजरत मौलाना इलियास रहमतुल्ला अली मस्जिदमध्ये कुराण पठण करण्यात आले. यामध्ये तलवण हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलेही वसल्लम, एक तास दुरुद शरीफ पठण करून त्यांच्या जीवनावर चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम प्रत्येक मस्जिद मध्ये घेण्यात आला आहे. तसेच एक तास दरूद शरीफचे पठण करण्यात आले. तर नाते पाक पठण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व उलेमा-ए-करम यांनी कठोर परिश्रम घेतले. यावेळी मौलाना युनुस हाफिज, अझहर उबैदुल्ला खान, फिरोज भाई, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.








