MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

किन्ही सवडत ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारविरोधात सदस्य व ग्रामस्थांचे आमरण उपोषण

भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत करून विविध समस्या समस्या सोडविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

किन्ही सवडत ता. चिखली ( प्रतिनिधी) तालुक्यातील किन्ही सवडत येथील विविध मागण्यासह ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त ग्रा.प. सदस्य व सदस्य पतीसह ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 28 जून रोजी ग्राम पंचायत सदस्य , सदस्यपती व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले. गावातील समस्या सोडवून सर्व मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही . असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार , गटविकास अधिकारी, ठाणेदार यांना दिले आहे. 

 

 

               चिखली तालुक्यातील किन्ही सवडत येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. ग्राम पंचायत कडून गावात सोयी सुविधा न दे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावामध्ये पाणी टंचाई, घाणीचे साम्राज्य, यासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार सुरू असून नियम बाह्य कामे सुरू आहे. भ्रष्टाचाराने ग्रामपंचायत पोखरली जात आहे. याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. येथील परिसरात द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधाऱ्याचे नियमबाह्य काम सुरू असून ग्रामपंचायत कडून जुन्याच बंधाऱ्यावर काम करण्यात येत आहे. सदर काम थांबवून योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील जंगलात मोठ्या प्रमाणत अवैधरित्या वृक्षतोड करण्यात आली आहे. तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच रोजगार सेवक नागरिकांची कामे करीत नाही त्यामुळे रोजगार सेवक बदलण्यात यावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना 21 जून रोजी देण्यात आले होते. यावेळी निवेदनात जर गावातील समस्या सोडवून विविध मागण्या मान्य करून अवैध वृक्ष तोड करण्यावर कारवाई करणे, जुन्याच बंधाऱ्यावर बांधकाम करून भ्रष्टाचार करण्यावर तसेच रोजगार सेवक बदलण्याची कारवाई न केल्यास 28 जून पासून किन्ही सवडत येथील ग्राम पंचायत समोर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार , बीडिओ यांनी कोणतीही कारवाई न केल्याने ग्राम पंचायत सदस्य , सदस्यपती व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले. सदर उपोषण ग्राम पंचायत सदस्य भागवत झाटे, सामाजिक कार्यकर्ते अमोल बोहरपी, सदस्यपती शिवाजी घोराडे, भरत दिवाणे यांनी सुरू केले आहे. यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही तसेच उपोषणकर्यांची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत व प्रशासनाची राहील असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जलमृदा संधारण अधिकारी, तहसीलदार, बीडिओ, ठाणेदार अमडापुर यांना दिल्या आहेत.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts