MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे यांना “राजमाता माँ जिजाऊ सन्मान” पुरस्कार जाहीर

विदर्भ सत्संग सोहळा समितीच्या वतीने 20 मे रोजी सि. राजा येथे कार्यक्रम

खामगाव (संतोष आटोळे)- विदर्भ सत्संग सोहळा समिती आयोजित परमपूज्य गुरुमाऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २० मे २०२५ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे भव्य राष्ट्रीय महासत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जागर स्त्री शक्तीचा-गजर राष्ट्रभक्तीचा निमित्ताने विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण व विशेष उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रबोधनकार, ज्येष्ठ समाजसेविका, साहित्यिका, समीक्षक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, “महाराष्ट्र शासन पुरस्कृत “राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त व ” श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार” प्राप्त या पुरस्कारासह देश विदेशातील 221 पुरस्काराच्या मानकरी वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांना ” राजमाता माँ जिजाऊ सन्मान ” हा पुरस्कार कार्यक्रम समन्वयक, श्री स्वामी समर्थ, विदर्भ सत्संग सोहळा समिती दिंडोरी यांनी जाहीर केला आहे.

ऊर्मिलाताई यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण आदि कार्यक्षेत्रात अत्युत्कृष्ट व प्रेरणादायी असे आदर्शवत, समाजाला नवीन दिशा, उर्जा व ऊर्मी देणारे कार्य आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनमानसात निर्माण केला आहे. त्यांनी केलेली जनसेवा, समर्पण आणि त्यांच्या कार्याची ऊर्जा ही समाजाला सदैव प्रेरणा देणारी आहे. उर्मिलाताई ठाकरे यांच्या या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल “राजमाता माँ जिजाऊ सन्मान”पुरस्कार दिनांक 20 मे 2025 रोजी वेळ दुपारी 3.00 वाजता मातृतीर्थ सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे परमपूज्य गुरुमाऊली यांचे उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे.

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts