MAHARASHTRANITI/महाराष्ट्रनिती

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खामगांव दौरा अन् शिवांगी बेकर्स कामगारांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

व्यवस्‍थापनाकडून आठ दिवसाचा पगार कापणार असल्‍याने कामगार आक्रमक तर कामगार अधिकारी व कामगार मंत्र्यांचे दुर्लक्ष

खामगाव (प्रतिनिधी ):- शिवांगी बेकर्स पारले कंपनी व्‍यवस्‍थापनाकडून कामगारांचा नाहक आठ दिवसांचा पगार कपात होत असून, तो त्‍वरीत थांबवावा, अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खामगाव दौऱ्यावेळी कामगारांकडून जल समाधी आंदोलन करण्याचा इशारा कंपनी शिवांगी बेकर्स कामगार संघर्ष समिती व कंपनीतील सर्व कामगारांकडून देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन ई-मेलद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार आयुक्‍त अमरावती कामगार सहायक आयुक्‍त अकोला, जिल्‍हाधिकारी बुलडाणा, जिल्‍हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा, सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा शिवांगी बेकर्स कपंनी व्‍यवस्‍थापन, खामगाव पाठविण्यात आले आहे.

निवेदनात नमूद आहे की, आम्‍ही सर्व कामगार शिवांगी बेकर्स पारले कंपनीत अनेक वर्षापासून काम करतो परंतू आम्‍हाला शिवांगी बेकर्स पारले कपंनी व्‍यवस्‍थापनाकडून किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळत नाही. तसेच कामगारांना जोर जबरदस्‍तीने व्‍यवस्‍थापनाकडून ओव्‍हरटाईम करायला लावणे, तसेच ओव्‍हरटाईचा मोबदला दुप्पट न देणे, कामगारांना कोणतीही सुविधा व्यवस्‍थापनाकडून पुरविल्‍या जात नाही. तसेच कामगारांच्या सुरक्षेकरीता कोणतीही उपाययोजना व्‍यवस्‍थापनाकडून केल्‍या जात नाही. तसेच शिवांगी बेकर्स पारले कंपनीकमध्ये वेगवेगळे विभाग असल्‍याने विविध विभागातील कामगारांना प्रशिक्षण न देता विभाग बदली करुन काम करायला लावणे. व्‍यवस्‍थापनाकडून कामगारांना नियमाप्रमाणे २६ दिवस काम न देणे, कंपनीतील कॅन्‍टीनमध्ये कामगारांना निकृष्ट्र दर्जाचा आहार देणे तसेच कामगारांना कॅन्‍टीनमध्ये माफक दरात आहारामध्ये सुट न देणे, व्‍यवस्‍थापनाकडून कामगारांना ओरीजनल पगार स्‍लीप न देेणे, तसेच कामगारांची चुकी काढून नाहक गेटपास लावणे व नंतर कामगारांकडून माफिनामा लिहून घेणे, या व्‍यतिरिक्‍त कामगारांकडून कंपनीचे नुकसान झाल्‍याचा ठपका ठेवून कामगारांच्या वेतनामध्ये कपात करणे. यासह इतर प्रकारचा छळ कंपनी व्‍यवस्‍थापनाकडून कामगारांना अनेक वर्षापासून कामगारांना दिल्‍या जात आहे. याबाबत आम्‍ही वेळोवेळी स्‍थानिक पोलीस स्‍टेशन, बुलडाणा जिल्‍हा सरकारी कामगार अधिकारी, कामगार सहाय्यक आयुक्‍त अकोला, कामगार आयुक्‍त अमरावती, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांंना सुध्दा वेळोवेळी तक्रारी निवेदन दिलेली आहेत. परंतू, त्‍या निवेदनाचा फायदा होत नसल्‍याने कामगारांच्या निवेदनाकडे कामगार मंत्री आकाश फुंडकर, जिल्‍हाधिकारी बुलडाणा, जिल्‍हा सरकारी कामगार अधिकारी कामगार सहा. आयुक्‍त अकोला, कामगार आयुक्‍त अमरावती यांचे सह संबंधीतांनी दुलर्क्ष केल्‍यामुळे संबंधीतांचे लक्ष वेधण्याकरीता ८ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी, खामगाव यांचे कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन कंपनील कामगारांकडून केल्‍या गेले होते. त्‍यांचा राग मनात ठेवून कंपनी व्‍यवस्‍थापनाने १४ मे २०२५ रोजी कंपनीतील क्रिम विभागातील कामगारांना कोणतेही प्रशिक्षण न देता पारले विभागात काम करण्याचे सांगितले होते. त्‍यावर कामगारांनी आम्‍हाला पारले विभागात काम करण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही म्‍हणून तिथे काम करु शकत नाही कारण त्‍या विभागातील आधुनिक मशिनरी आम्‍ही कधीच हाताळलेल्‍या नसल्‍याने तिथे आमच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो व कंपनीचे नाव सुध्दा खराब होवू शकते. असे म्‍हणत आम्‍हाला आधी प्रशिक्षण द्या व नंतर त्‍या विभागात कामावर पाठवा असे कामगारांकडून कंपनी व्‍यवस्‍थापनाला सांगितले असता व्यवस्‍थापनाने कामगारांचे ऐकले नाही.व तुम्‍हाला प्रशिक्षण नसतांना सुध्दा काम करावेच लागेल अशी धमकी देऊन अरेरावी केल्‍यामुळे सर्व कामगारांनी एकत्रित येवून १४ मे रोजी कंपनीत काम केले नाही. म्‍हणून १४ मे रोजी कामगारांनी काम न केल्‍यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्‍याचा ठपका व्‍यवस्‍थापनाकडून कामगारांवर ठेवला व कंपनी व्‍यवस्‍थापनाकडून २०० कामगारांना आठ दिवसाचा पगार कापण्याची नोटीस सुध्दा दिलेली आहे. दोनशे कामगारांचा आठ दिवसांचा पगार ८ लाख ७५ हजार २०० एवढी मोठी रक्‍कम नाहक कामगारांकडून कपंनी व्‍यवस्‍थापन घेत आहे. हा कामगारांवर मोठा अन्याय असून, कामगार व त्‍यांचे परिवारावर उपासमारीची वेळ आली असल्‍याने अनेक कामगार व त्‍यांच्या परिवारातील सदस्‍य चिंतेत आहेत. कंपनी व्‍यवस्‍थापनाकडून कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरोधात कामगारांकडून दिल्‍या गेलेल्‍या तक्रारी, निवेदन व उपोषण यांच्याकडे,वरिल संबंधीतांनी दुर्लक्ष केल्‍यामुळे कामगारांनी जलसंमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवांगी बेकर्स कपंनीतील कामगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खामगाव दौऱ्याच्या दिवशी जनूना तलाव येथे जलसमाधी आंदोलन करणार आहेत. याची संपुर्ण जबाबदारी आज पर्यंत कामगारांनी दिलेल्‍या तक्रारी, निवेदने व आंदोलनाच्या दुर्लक्ष करणाऱ्या संबंधीतांची राहील यांची आपण नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन शिवांगी बेकर्स मधील संघर्ष समितीचे पदाधिकारी व कामगार यांनी दिले आहे.

कामगार मंत्र्यांनी कामगारांवर होणारा अन्याय थांबवावा

एका कामगाराचे एक दिवसाचे वेतन सर्व मिळुन ५४७ रुपये असे एकुण आठ दिवसांचे वेतन ४३७६रुपये होतात. म्हणजे ४३७६ ×२०० कामगारांचे एकुन वेतन ८ लाख ७५ हजार,२०० रुपये कंपनी व्यवस्थापन कामगारांचे वेतन कापणार असल्याने याकडे कामगार मंत्री यांनी लक्ष देऊन कामगारांवर होणारा अन्याय थांबवावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांसह कामगारांकडून होत आहे

Maharashtraniti
Author: Maharashtraniti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts