बुलढाणा(मिर्झा अक्रम बेग) :- हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश कमिटीची १५ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन बैठक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकित पत्रकारांच्या समस्या, विविध स्तरावर संघटनेचा विस्तार व आगामी कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. या बैठकित हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पत्रकारिता व पत्रकारांची स्थिति आज चिंतनीय आहे. पत्रकार लोकशाहीचा मजबूत स्तंभ आहे. हा स्तंभ मजबूत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष असलम कुरैशी यांनी केले. प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली . यामधे प्रदेश कार्याध्यक्ष पदी आयेशा खान मुलानी तर महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी विनोद भोकरे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच राज्यातील जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या करणार आल्या.

हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनला महाराष्ट्रात मजबूत करून पत्रकारांच्या एकतेसाठी प्रयत्न केले जातील. असे प्रतिपादन नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी यांनी केले.
तद्नंतर नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांनी बोलताना राज्यात पत्रकारांवर होणारे अन्याय आणि अत्याचार विरुद्ध आवाज उठविला जाईल तसे पत्रकार हा कोणत्याही संघटनेचा की वृत्तपत्राचा असला तरी हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशन ही संघटना पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. तर देशात किंवा राज्यात पत्रकारांवर अन्याय झाल्यास अशा पत्रकारांनी संपर्क करण्याचे आवाहन विनोद भोकरे यांनी यावेळी बोलताना केले.
या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी (जालना), महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी (जालना), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनोद भोकरे (खामगांव जि. बुलढाणा), महाराष्ट्र प्रदेश सचिव जावेद पठाण (भोकरदन जि. जालना), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रणजितसिंह ठाकूर (रिसोड जि. वाशिम), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालाजी अडियाल (जालना), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रियाज शेख (नागपूर), महाराष्ट्र प्रदेश सहसचिव शेख शकिल (रावेर जि. जळगांव), मराठवाडा प्रवक्ता रहिम पठाण (सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर), विदर्भ प्रवक्ता सय्यद जावेद (नागपूर), महाराष्ट्र प्रदेश मिडिया प्रभारी अमजद पठाण (जिंतूर जि. परभणी), महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष मुज़म्मील कुरेशी (जालना) यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य फहिम शेख (नागपूर), शुजाअत कुरेशी (कामठी जि. नागपूर), राम काडवते (रामटेक जि. नागपूर), उमेश गोधने (खामगांव जि. बुलढाणा), राम भैराम (सिवनी), धनंजय तरारे (नागपूर) आदींचा समावेश करण्यात आला.
तसेच यावेळी विभागीय आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामधे हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनची विदर्भ विभागीय अध्यक्ष हाजी मो. तारेक शेख, नागपूर जिल्हाध्यक्ष देवेंद्र मुरकुटे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मिर्झा अक्रम बेग (खामगांव), औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष शामका चव्हाण, अमरावती जिल्हा अध्यक्ष मुबिन भाई, वाशिम जिल्हा अध्यक्ष फय्याज कुरेशी, गोंदीया जिल्हा अध्यक्ष गौरव कुमार, वर्धा जिल्हा अध्यक्ष तन्वीर खान यांची नियुक्त्या करण्यात आल्या.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हाजी मो. तारेक शेख, देवेंद्र मुरकुटे, शामका चव्हाण, मिर्झा अक्रम बेग, अब्दुल मुबिन, फय्याज कुरेशी, गौरव कुमार, तन्वीर खान आदींनी अभिनंदन केले.
राज्यात पत्रकारांना समस्या किंवा अडचण आल्यास महासचिव विनोद भोकरे यांच्या मोबाईल नंबर 9021889488 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.








