खामगाव (प्रतीनिधी):- विराट मल्टीपर्पज फाउंडेशनेच खामगावचे अध्यक्ष मनोज नगरनाईक व मनोहर येळणे गुरुजी यांच्यावतीने आयोजित नववर्षे चैत्र गुढीपाडवा १९४६ या राष्ट्रीय दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत टॉवर चौकातील पत्रकार कट्टा येथे संपन्न झाला.या राष्ट्रीय दिनदर्शिकेचे विमोचन गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर विश्व हिन्दु परिषद जिल्हाअध्यक्ष राजुभाऊ झापर्डे, सत्यशोधक जनसेवा समीतीचे राज्य सचिव संजयभाऊ बगाडे, बजरंगदलाचे अमोल अंधारे, यांच्या हस्ते तर प्रशांत देशमुख, किशोरभाऊ भोसले, अनुप गवळी, योगेश हजारे, संभाजीराव टाले, ईश्वर ठाकुर, गणेश पानझडे, महेश देशमुख, धनंजय वाजपे, विकास कुळकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख राजुभाऊ झापर्डे यांनी बोलतांना अनादी काळापासून असलेली आपली संस्कृती शके दर्शविणारी दिनदर्शिका टिकविणे आज काळाजी गरज बनलेली आहे. या दिनदर्शीकेचा वापर आपल्या दैनिक व्यव्हारात करावा, तर संजय बगाडे यांनी बोलतांना दिनदर्शीकेनुसार आपण आपले बॅकिंग व्यव्हारही या तारखे नुसार करु शकतो. यासाठी सरकारने आधीच मान्यता दिलेली आहे. तसेच कार्यक्रमाला उपस्थितीत मान्यवरांसह पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले. दिनदर्शिका विमोचनाच्या कार्यक्रमासाठी संतोष आटोळे, क्षञुघन इंगळे, शेखर तायडे, गजानन कुळकर्णी, महादेवराव पांडे, मधुकर पाटील, वसंत चीखलकर, मोहम्मद रईस, पापा मुक्ते यांनी सहकार्य केले








